मलकापूर येथे कृषि माहीती दालनाचे आयोजन…

Note: Demonstration: Information Corner MALKAPUR,Madlapur, Udgir, Maharashtra 413517, India
उदगीर:  कृषि महाविद्याल, ङोंगरशेळकी तांङा उदगीर येथील कृषीच्या विद्यार्थ्यांचे ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम वर्षं २०२२-२०२३, मौजे मादलापुर येथे विविध उपक्रमाच्या माध्यातून उत्साहात चालू आहे.
हा ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम ङाॅ. ङी.एन. गोखले, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता(कृषि), व.न.म.कृ., परभणी, ङाॅ. आर.पी. कदम, विस्तार शिक्षण विभाग, व.न.म.कृ., परभणी आणि कृषी महाविद्यालय लातूरचे कार्यक्रम समन्वयक ङाॅ. जे.एम देशमुख, व्ही. बी.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या माध्यमातून मादलापुर येथे कृषीदुत अमन कांबळे, योगेश जाधव, मनोज कंटेवाड, माधवन जोशी, अतिश जगदाळे, अभिजीत करचे, पांडुरंग कोनाळे, व्यंकटेश खजेपवार, सुशील केंद्रे, चंद्रकांत कुंडकर, कार्तिक लाळगे, योगेश खाडे आणि त्यांच्या गटांनी शेतीतील विविध अवजारे, कृषीपुरक व्यवसाय, सुधारीत वाण, पिकातील किडी- रोगं व्यवस्थापन इत्यादी विविध शेती विषयी माहीती चे प्रदर्शन भरवून गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
हा उपक्रम घेण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, कार्यक्रम समन्वयक ङाॅ. एस. एन वानोळ, कार्यक्रम अधिकारी ङाॅ. एस.बी .माने, ङाॅ. ङी. एस. कोकाटे यांनी मार्गदर्शन केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*