CSMSS COA च्या विद्यार्थ्यांनी राबिविली नागापूर पशु लसीकरण मोहीम

CSMSS COA च्या विद्यार्थ्यांनी राबिविली नागापूर पशु लसीकरण मोहीम

छ. संभाजीनगर:  सध्या लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण हे जास्त प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे तसेच गावामधून जास्तीत जास्त जनजागृती करण्याची गरज जाणवत आहे त्या अनुषंगाने छ.शा.म.शि. संस्था संचलित कृषि महाविद्यालय, कांचनवाडी येथील सातव्या सत्रात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक कार्यक्रमा अंतर्गत नागापूर. ता. पैठण, जि. औरंगाबाद येथे दिनांक २३/०८/२०२३ रोजी पशु लसीकरण मोहीम राबिविण्यात आली.

या प्रसंगी पशुवैद्यकीय डॉ. शेजुळ यांनी जनावरांना लसीकरण केले. या कार्यक्रमासाठी गावातील कृषि मित्र व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनावरांना पावसाळ्यात होणारे आजार व घ्यावयाची काळजी तसेच लम्पी स्कीन आजाराविषयी माहिती दिली व त्यावरील उपचार व जनावरांची घ्यावयाची काळजी यामध्ये गोठ्यातील स्वच्छता, स्वच्छ पाण्याचे नियोजन व जनावरांमध्ये लसीकरणाचे महत्व तसेच आजारी जनावर यांना इतरापासून वेगळे ठेवणे व प्रभावी वैद्यकीय उपचार करण्या विषयी माहित दिली तसेच गोठा आणि परिसरात कीटकनाशकांची फवारणी करणे किंवा अशक्तपणा, ताप आला असल्यास तातडीने उपचार करण्याविषयी मार्गदर्शन केले 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*