CSMSS COA च्या विद्यार्थांनी नागापूर येथे गांधुळखत निर्मिती बद्दल मार्गदर्शन केले

CSMSS COA च्या विद्यार्थांनी नागापूर येथे गांधुळखत निर्मिती बद्दल मार्गदर्शन केले

छ. संभाजीनगर: सध्या भूमी प्रदूषण कमी करण्यासाठी गांडूळखत हे जास्त प्रमाणात वापरण्याची आवश्यकता आहे तसेच गावात जास्तीत जास्त जनजागृती करण्याची गरज जाणवत आहे त्या अनुषंगाने छ.शा.म.शि. संस्था संचलित कृषि महाविद्यालय, कांचनवाडी येथील सातव्या सत्रात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक कार्यक्रमा अंतर्गत नागापूर. ता. पैठण, जि. औरंगाबाद येथे दिनांक ६ . ९ . २३ रोजी गांडूळखत निर्मिती विषयी माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी गावातील कृषि मित्र व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भूमी प्रदूषण बद्दल माहिती दिली व त्यावरील उपचार म्हणून गांडूळ खताचे फायदे व ते बनवल्या लागणारी सर्व वस्तू आणि प्रक्रिया बद्दल सर्व माहिती गावकऱ्यांन पर्यन्त पोहचवली .

यावेळी महाविद्यालयाचेविद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी के शेळके, प्राचार्य डॉ. पी. एस. बैनाडे, उपप्राचार्य प्रा.ए. ए.भोंडवे, प्रा. के. जी. सोळंकी, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.पी. डोंगरजाल व कार्यक्रम अधिकारी प्रा. नंदू भगस यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.



 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*