उदगीर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्नित कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील कृषि पदवीच्या अंतिम आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांना अनुभवाधारित कौशल्य उपक्रमांतर्गत दुध आणि दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया व उत्पादन , अंळिबी उत्पादन तंत्रज्ञान , सेंद्रिय खतांचे व्यावसायिक उत्पादन आणि विक्री, जैविक घटक व कीटकनाशकांचे उत्पादन, कोंबडी पालन व उत्पादन, फळ व भाजीपाल्याचे काढणीपश्चात व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन इत्यादीं शेतीपूरक व्यवसायांचे कौशल्य विकास शिक्षण व प्रशिक्षण देण्यात येत आहे. या अनुभवाधारित अभ्यासक्रम उपक्रमांसाठी एकुण ११२ विद्यार्थ्यां – विद्यार्थीनींनी नोंदणी केलेली आहे . या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात धिंगरी अळिंबीच्या विविध प्रजातींचे उत्पादन , विविध खाद्य पदार्थ निर्मिती व विक्री व्यवस्थापण ; पनीर, खवा, बासुंदी,गुलाब जामून, बर्फी, श्रीखंड, कलाकंद, पेढा, लस्सी, आईसक्रीम, मिल्कशेक, रबडी, कुल्फी, रसगुल्ला, मिल्क फालुदा हे दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व विक्री ; लिंबाचे तिखट व गोड लोणचे, सीताफळाचा रस, लिंबू शरबत, टोमॅटो सॉस, टोमॅटो पावङर, आले-लसूण पेस्ट,जाम,जेली मार्मलेड अशा विविध फळांपासून पदार्थ तयार करणे .गांडुळखत, व्हर्मीवॉश, दशपर्णी अर्क, पंचगव्या, बीजमृत, जीवामृत, नीमास्त्र, निंबोळी अर्क , जैविक घटक आणि जैविक कीडनाशकांचे ( उदा. ट्रायकोग्रामा चीलोनीस, ब्रॅकाँन ब्रेवीकॉर्निस आणि क्रायसॉपरला काॅरनिया ) अशा जैविक कीटकनाशकांचे उत्पादन , उपयुक्ततता व विक्री ईत्यादी चे
अनुभवाधारित कौशल्य विकास अभ्यासक्रमांतर्गत तांत्रिक व शास्त्रोक्त प्रशिक्षण विद्यार्थींना देवून त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे .उत्पादित विविध पदार्थांचे पॅकिंग लेबलींग व विक्री ही विद्यार्थीं स्वतः करून नफा मिळवत आहेत. अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमांतून परिसरातील शेतकरी, महिला, महीला बचत गट , सुशिक्षित तरूण बेरोजगारांना मार्गदर्शन व जनजागृती करून शेतकऱ्यांच्या विविध शंकाचे निरसन विद्यार्थी करीत आहेत.
महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या अशा विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या कौशल्य विकास विविध उपक्रमांची पहाणी , तपासणी व मूल्यांकन ङॉ.पद्ममाकर बी.वाङीकर , प्रतीनीधी संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि) व.ना.म.कृ., परभणी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकतीच केली आणि त्यांनी या उपक्रमांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले . त्याचबरोबर , बाजारपेठ व विक्री व्यवस्थापनाचे योग्य नियोजन आणि आर्थिक नफा कसा मिळवायचा याविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .
या विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम , कृषीवर अधारित विविध निविष्ठा उत्पादन उद्योगांतील संधी , विक्री व्यवस्थापण , रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी याबाबतचे मार्गदर्शन या कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. एल. व्ही. पिंपळपल्ले, डॉ. ए. एम. पाटील, ङॉ. आनंद दापकेकर ; अनुभवाधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे प्रभारी ङाॅ. ङि.जी.पानपट्टे, प्रा.प्रविण राठोङ, डॉ. शेख वसीम,डॉ. एस. बी. पवार, डॉ. एस. बी. माने, प्रा.राहुल आधव, डॉ. व्ही.एम.शिंदे, डॉ. एस. एल खटके, प्रा. शितल पाटील ; सहयोगी विषय विशेषज्ञ प्रा. एस. टी. डफडे, प्रा. ए. बी. मळभागे, डॉ. ए. पी. बाबर, डॉ. एस. एन. वानोळे, ङॉ. ङी. एस. कोकाटे, प्रा.व्ही.एल. सोमवंशी, प्रा. एस.ङी. लंजे यांनी व ईतर तज्ञ प्राध्यापकांनी त
यांचे अविरत विशेष मार्गदर्शन लाभत आहे.
महाविद्यालयातील , सदरहू विविध कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वीरित्या राबविण्यासाठी नंदीग्राम कृषि एवम ग्रामविकास संस्थेचे ( सुगाव ) सचिव मा. गंगाधरराव दापकेकर आणि अध्यक्ष डाॅ . संग्राम पटवारी यांचे भौतिक , मानसिक व आर्थिक पाठबळ लाभले .
Leave a Reply