राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत युवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास, विशेष युवक शिबिराचे आयोजन

परभणी :  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत, नंदिग्राम कृषी एवंम ग्रामविकास संस्था सुगाव संचलित, कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर आयोजीत  युवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास, विशेष युवक शिबिर  शैक्षणिक वर्ष २०२२-२३  दि. २३ ते २७  मार्च पर्यंत मौजे गव्हाण ता.जळकोट जि. लातूर येथे  आयोजन  करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून सरपंच बालाजी गुडसुरे, उद्घाटक श्रीमती शीलाताई अजितराव पाटील, माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक लातूर , प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव संस्थेचे सचि श्री गंगाधर रावजी दापकेकर, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र तोडकर, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त गणेश रेकुळवाड , चेअरमन वेंकटराव पत्तेवार, पोलीस पाटील रावसाहेब जाधव, आशिष पाटील राजुरकर संचालक वि.का.सो अतनुर ,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंगदराव सूर्यवंशी* , सहयोगी  प्रा.  डॉ.अशोकराव पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ.ए जी दापकेकर,  रा.से. या. कार्यक्रमाधिकारी प्रा.सचिन खंडागळे,  कार्यक्रम समन्वयक डॉ.दीपाली कोकाटे व डॉ.प्रशांत राठोड. तसेच गावातील प्रगतशील शेतकरी, अनिल श्रीनिवास पत्तेवार, अभिजीत शरदचंद्र पाटील, व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते,
         कार्यक्रमाची सुरुवात‎ सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन, प्रतिमा‎ पूजनाने झाली. शिबीराच्या उदघाटन‎ प्रसंगी महाविद्यालयाचे सचिव गंगाधररावजी दापकेकर साहेब यांनी शिबीरातील‎ विद्यार्थी व गावकरी यांना श्रमदानाचे‎ महत्त्व सांगितले.‎या शिबीर कालावधीत ग्राम‎ स्वच्छता, रस्ते स्वच्छता, गाजर‎ गवत निर्मुलन, वृक्षारोपन, शोषखड्डे,‎ गटार दुरुस्ती, मंदिर सफ़ाई, मतदान जनजागृती, अंधश्रद्धा निर्मुलन व‎ विविध विषयावरील व्याख्याने‎ इत्यादी उपक्रम राबवण्यात येतील‎ असे सांगितले. कार्यक्रमाच्या उद्घाटन कर्ताया श्रीमती शीलाताई अजितराव पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व व या कार्यक्रमाचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले,
           या शिबिरांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत पशुरोग निदान व उपचार शिबिर, शेतीपूरक उद्योजकता विकास व संधी, यासारख्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांशी संवाद व परिसंवाद म्हणून गांडूळ खत उत्पादन, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ उद्योजकता, सोयाबीन व तूर लागवड तंत्रज्ञान यासारखे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामसंपर्क, मुक्त विचारपीठ, चर्चासत्र ,सांस्कृतिक पथनाट्य व उद्बोधन पर कार्यक्रम यांचेही आयोजन विद्यार्थी व कृषी महाविद्यालयीन तज्ञांकडून गावातील नागरिकांना व पंचक्रोशीतील नागरिकांना लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी गावातील सर्व सुजान नागरिकांची, प्रगतशील शेतकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी विशाल पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ .ए.पी सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*