किनगाव येथे पार पडले जनावरांचे भव्य लसीकरण

(छायाचित्र) लसीकरण करते वेळी कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी सह डॉ. दिपक चव्हाण ,मा. बाळू चव्हाण व गावकरी

फुलंब्री(औरंगाबाद): फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय या अंतर्गत भव्य पशुलसिकरणाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळा सुरू झालेला असून पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण महत्वाचे आहे. शेतकऱ्यांमध्ये याची जनजागृती व्हावी, यादृष्टीने या शिबीराचे आयोजन केले होते.

महाविद्यालयाचे विद्यार्थी अभिजीत वाघ, यश वाघ, ऋषिकेश वाघ, कृष्णा वाघ,अजय चव्हाण,नवनाथ गाडेकर,अजिंक्य भुसारी, आकाश फसले,अमित आर्दड,अमन मगर,तेजस जाधव,गणेश जाधवयांनी या लसिकरणाचे आयोजन केले होते.

लसिकरणासाठी FMD, लाळ्या-खुरकुत व फऱ्या या रोगांची लस जनावरांना देण्यात आली. जवळपास १०० जनावरांना लसी देण्यात आल्या.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. शेळके यांचे मार्गदर्शन लाभले तर डॉ. सचिन गायकवाड, प्राध्यापक कैलास सोळंकी आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रणिता मुळे यांचे योगदान कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाभले. त्याचबरोबर पशुवैद्कीय डॉ.दिपक चव्हाण यांनी लसीकरण करण्यासाठी मदत केली आणि सर्व ग्रामस्थ कार्यक्रमासाठी उपस्थित होते.


Contact (for news):

G-mail:  bscagristudy@gmail.com


 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*