उदगीर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्नित कृषि महाविद्यालय, डोंगर शेळकी तांडा, उदगीर येथील पदवीच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यानी अनुभवावर आधारित कार्यक्रम अंतर्गत सेंद्रिय खताचे व्यावसायिक उत्पादन आणि विपणन या उपक्रमांतर्गत गांडुळखत, व्हर्मीवॉश, दशपर्णी अर्क, पंचगव्या, बीजमृत, जीवामृत, नीमास्त्र, निंबोळी अर्क यासारख्या सेंद्रिय उत्पादनाची निर्मिती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या उपक्रमास महाविद्यालयातील अंतिम सत्रातील ३९ विद्यार्थ्यांची सर्वप्रथम निवड करण्यात आली. या मध्ये विविध सेंद्रिय उत्पादन निर्मितीचा प्रात्यक्षिक अणि तांत्रिक अभ्यास करुन, शेतीला पूरक व्यवसाय कसा ठरेल या व्यावसायिक दृष्टिकोनाने प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन घेतले.
उत्पादित गांडुळ खत, व्हर्मीवॉश आणि दशपर्णी अर्क, पंचगव्या, बीजमृत, जीवामृत, नीमास्त्र, निंबोळी अर्क या सेंद्रिय उत्पादनाला शेतकरी वर्गांकडून खुप मागणी आहे. उत्पादित खतांची पॅकींग, लेबलिंग करुन थेट विक्री शेतकरी तसेच विविध नर्सरी यांना करुन नफा मिळविला. या उपक्रमाच्या माध्यमातून परिसरातील शेतकर्यांमध्ये सेंद्रिय खतांचे महत्त्व या विषयी जनजागृती करण्यात आली. गांडूळखत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे असे अव्हान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणीचे अधिष्ठाता डॉ. डी. एन. गोखले यांनी भेटी दरम्यान केले.
तसेच महाविद्यालयातील गांडुळ खत निर्मिती, व्हर्मीवॉश, दशपर्णी अर्क या यूनिट ला सभोवतील परिसरातील शेतकरी येउन भेटी देतात व त्यांच्या विविध शंकांचे निरसन या उपक्रमाचे विद्यार्थी करत आहेत.
तसेच या उपक्रमाला पदव्युत्तर कृषि व्यवस्थापन संस्था, चाकुरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हेमंत पाटील, प्रा. बी व्ही इंगळे, ङॉ.व्ही जी. टाकनकर , संस्थेचे सचिव श्री. गंगाधररावजी दापकेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अपक्रमाची पाहणी केली व विद्यार्थ्यांची स्तुती केली. हा अनुभवावर आधारित उपक्रम यशस्वी होण्यासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. एल. व्ही. पिंपळपल्ले, डॉ. ए. एम. पाटील, विभागप्रमुख डॉ. शेख वसीम, कार्यक्रम प्रभारी डॉ. एस. बी. पवार, प्रा. एस. एस. नवले, प्रा. बी. बी. निमनवाड, सहयोगी विषय विशेषज्ञ प्रा. एस. टी. डफडे (मृदा शास्त्र), डॉ. ए. पी. बाबर (कृषि अर्थशास्त्र), प्रा. ए. बी. मळभागे (कृषि वनस्पतिशास्त्र), डॉ. एस. एन. वानोळे (विस्तार शिक्षण विभाग) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply