कृषिकन्यामार्फत ग्रामीण मुल्यमापन

उदगीर : कृषि  महाविद्याल, ङोंगरशेळकी तांङा  उदगीर  येथील  कृषिच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम वर्षं  २०२२-२०२३, मौजे इस्मालपूर येथे विविध उपक्रमाच्या   माध्यातून उत्साहात चालू आहे.
हा ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम ङाॅ. ङी.एन. गोखले, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता(कृषि), व.न.म.कृ., परभणी,  ङाॅ. आर.पी. कदम, विस्तार शिक्षण विभाग, व.न.म.कृ., परभणी आणी कृषि महाविद्यालय लातूरचे  कार्यक्रम समन्वयक ङाॅ. व्ही. बी.काबळे यांच्या  मार्गदर्शनाखाली संबंध मराठवाड्यामध्ये विविध कृषि महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
या माध्यमातून  इस्मालपूर गावात ग्राम चर्चासञ आणी ग्रामीण  मुल्यमापन(पि.आर.ए.)  उपक्रमाचे आयोजन केले. ग्रामपंचायत  कार्यालयामध्ये चर्चासत्राचे आयोजन केले. या माध्यमातून गावातील सविस्तर माहिती घेण्यात आली. त्यानंतर   ग्रामीण  मुल्यमापन उपक्रम घेतला.  यामध्ये रांगोळी च्या माध्यमातून गावातील अङचणी, नैसर्गिक स्त्रोत, शेतीखालील क्षेत्र, गावातील आर्थिक स्थिती, सामाजिक व्यवस्था, कृषी व्यवस्था आणी शैक्षणिक व्यवस्था इत्यादी  विषयक माहिती विविध आकृतीच्या माध्यमातून  गावतील लोकांना सविस्तर सांगितली.
हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुप्रिया कांबळे, रोहिता मोरोजू, साक्षी कवठेकर, हर्षदा लेंगुळे, आरती कलमे, प्रणिता कापसे, संजना मेश्राम इत्यादी कृषिकन्यांनी  आयोजीत केला.या उपक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे  प्राचार्य  ङाॅ  ए. एम. पाटील, कार्यक्रम समन्वय  ङाॅ.  एस.एन. वानोळे आणी कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.एस. काळे, गावातील  संरपच संगिता अमोल कुंडगीर शेतकरी, महीला, तसेच जिल्हा परिषद शाळेचें  शिक्षिका व गावातील प्रतिष्ठित नागरीक  उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*