पैठण (औरंगाबाद): औरंगाबाद येथिल छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित, कृषी महाविद्यालय व पशुवैद्यकीय दवाखाना ढाकेफळ यांच्या डॉ राजेंद्र धानगड सौजन्याने मुलांनी वाडगाव ता.पैठण येथे पावसाळा पुर्व भव्य पशु आरोग्य तपासणी व लसिकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या पावसाळा सुरू झालेला असुन पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण महत्वाचे आहे .यावेळी प्रात्यक्षिक आणि जाणिव जागृती शेतकरयांमध्ये व्हावी हा उद्देश ठेवून महाविद्यालयीन संस्थेचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी रोहन राजबिंडे, अभिषेक नागरगोजे, श्रीकांत नवघरे, प्रल्हाद पाचर्णे,प्रफुल्ल निकम, प्रसाद पाटील, महेश पोगकुला, जसवंत,अभय नागरे, पंकज पावरा, माधवी राते, अलीशा मेशराम मंगळवार यांनी दि.१७/०६/२०२२ रोजी तोंडोळी येथिल गोशाळेत या लसिकरणाचे आयोजन केले होते.याशिबिरामध्ये एकूण ३०० जनावरांना तपासणी करुन लाळ्या खुरकत व फर्या रोगावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने लसी देण्यात आल्या.
हा लसिकरण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.के. शेळके यांचे मार्गदर्शन लाभले तर डॉ.सचिन गायकवाड, प्राध्यापक कैलास सोळंकी व कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रणिता मुळे यांचे योगदान कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाभले.
यावेळी पैठण तालुका उपाध्यक्ष विद्यमान उपसरपंच सतीश शेळके, ग्रामसंसद कार्यालय चे कर्मचारी विजय शिंदे, वाल्मिक दुबिले, संगणक चालक सुरज शिरवत, पत्रकार गणेश उघडे आदिंसह सर्व ग्रामस्थ व पशु पालक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
Contact (for news):
G-mail: bscagristudy@gmail.com
Leave a Reply