गावकऱ्यांच्या मदतीने रांगोळीच्या साह्याने गावाचा नकाशा तयार करतांना विद्यार्थी
कापुसवाडी (पैठण): छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कांचनवाडी मधील विद्यार्थी कृषिकन्या आणि कृषी दूतांनी कापुसवाडी येथे ग्रामीण जागरुकता कार्यानुभव प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत ग्रामीण लोकसहभागीय मुल्यावलोकन (PRA) उपक्रम राबविला.
गावाचा विकास लोकसहभागानेच शक्य आहे. त्यासाठी लोकसहभागीय मुल्यावलोकन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यांनी केले. ग्रामीण लोकसहभागीय मुल्यावलोकन योग्यरितीने, शिस्तबध्दपणे केल्यास लोकांचा, ग्रामस्थांचा सहभाग मिळवून त्यांच्यापर्यंत लोकसहभागाचे महत्व व गावचा विकासायाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे शक्य आहे. यावेळी हिवरा बाजार या आदर्श गावावर आधारीत विडिओ-सुध्या दाखविण्यात आला.
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागृकता चा कार्याअनुभव उपक्रमात रांगोळीच्या साह्याने गावाचा नकाशा गावकऱ्यांच्या मदतीने तयार करून घेतला. ग्रामीण लोकसहभागीय मुल्यावलोकन (PRA) या उपक्रमाअंतर्गत गावातील सामाजिक संस्था ,पाणी स्रोत , विविध सेवाभावी संस्था इत्यादी ची माहिती गावच्या नकाशात विद्यार्थ्यांनी दाखवली व तसेच या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शेती उत्पादकता, किड नियंत्रण,खत व्यवस्थापन, माती परीक्षण, व विविध शासकीय योजना बाबत कृषिदूत आणि कृषिकन्या यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .
महाविद्यालयाचे विद्यार्थी दिपक जाधव, प्रज्वल सोनसळे,निखिल इंगोले,तन्मय इंगोले,जे माधव,इंगु विद्यासागर,नागा पवनसाई ,प्राजक्ता सवासे, अर्पिता स्वामी, मयुरी घाटेराव, नेहा शिंगारे, स्वर्णलता पूट्टा, आशा मेडीपल्ली , यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि. के. शेळके सर तसेच कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रणिता मुळे मॅडम यांचे मार्गदर्शन उपक्रम यशस्वीतेसाठी लाभले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सरपंच बाबासाहेब ढोले, उपसरपंच तुकाराम इंगळे तसेच सहकारी सोपान इंगळे व इतर गावकरी यांनी प्रतिसाद दिला.
Leave a Reply