उदगीर येथील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल संपन्न** विविध कृषि संशोधन व शिक्षण संस्थेला दिल्या भेटी

      परभणी  :  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील कपृषि पदविच्या शेवच्या सत्रातील अनुभावाधारीत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल बारामती, महाबळेश्वर, दापोली आणि कोल्हापूर येथे नुकतीच जाऊन आली. या शैक्षणिक सहलीमध्ये एकुण १०२ विद्यार्थी – विद्यार्थिनी आणी  ६ प्राध्यापक सहभागी झाले होते.
    विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा विकास करणे, त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि त्याचबरोबर पदवी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सामाजिक, शैक्षणिक व उद्योजकीय विकास व्हावा या उदात्त हेतुने दिनांक २१  ते २८ जानेवारी , २०२३ दरम्यान या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. 
     या शैक्षणिक सहली अंतर्गत , प्रथम बारामती येथील कृषि विज्ञान केंद्र व राष्ट्रीय स्तरावरील कृषि प्रदर्शनास भेट देऊन प्रगत आधुनिक तंत्रज्ञानाची माहीती अवगत केली . त्याचबरोबर , महाबळेश्वर येथील शुभम स्ट्रॉबेरी फार्म , दापोली येथील ङाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातील विविध संशोधन प्रकल्पांना उदा . सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग , फळ व भाजीपाला प्रक्रिया केंद्र, उती संवर्धन , मध्यवर्ती रोपवाटीका, आळंबी उत्पादन , लाखी बाग, हापुस आंबा, काजू व नारळ  बागा, कृषि महाविद्यालय व विद्यापीठ ग्रंथालय ईत्यादींना प्रत्यक्ष  भेटी देऊन  तज्ज्ञांकडून  ज्ञान संपादन केले . तसेच , मोरगाव , जेजुरी, कोल्हापूर व पंढरपूर या  तीर्थक्षेत्रांना भेटून देवदर्शन सुध्दा लाभ घेतला . 
    या शैक्षणिक सहलीतून विद्यार्थ्यांना नवनविन शेतीविषयक तंत्रज्ञान ,  उद्यमशीलता , उद्योग – व्यवसाय , विक्री व्यवस्थापण , उपलब्ध बाजारपेठा ईत्यादी विविधांगी  विषयांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.
    दापोली विद्यापीठातील डॉ. एस.आर. भारंब, ङॉ.व्हि. बी. कङव, ङाॅ. कुलकर्णी , ङॉ. सी ङी पवार,  ङॉ. मंदार पूरी श्री. शुभम पाटील यांनी व ईतर तज्ञांनी  सविस्तर  मार्गदर्शन  केले. 
     या शैक्षणिक सहलीच्या नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य ङॉ.अंगदराव सूर्यवंशी, उप प्राचार्य  ङॉ.एल.व्हि पिपंळपल्ले, ङॉ.आशोकराव पाटील आणि ङॉ.अनंद दापकेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन  केले. 
     ही शैक्षणिक सहल निर्विघ्न व शिस्तबद्धपणे संपन्न  होण्यासाठी  महाविद्यालयाचे ङॉ. सुनिल पवार, ङॉ.विजय शिंदे, ङॉ. शिवाजी माने, ङॉ.दिपक पानपट्टे, प्रा. शितल पाटील, प्रा एस .व्ही जाधव,  श्री एम.एन. गवळी यांनी अथक परिश्रम  घेतले. त्याबद्दल , महाविद्यालय व्यवस्थापनाने व प्रशासनाने सहलीत सहभागी सर्व प्राध्यापक , कर्मचारी आणि र्विद्यार्थी- विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन केले .

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*