किनगाव(औरंगाबाद): फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय या अंतर्गत घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये सेंद्रिय खते जसे बीजमृत, जीवामृत , पंचगव्य, दशपर्णी अर्क यांसारख्या सेंद्रिय खतांच्या निर्मितीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांना सेंद्रिय खते बनवण्यासाठी लागणारे साहित्य व ते बनवण्याच्या पद्धती यांबाबत जनजागृती व्हावी, यादृष्टीने या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. शेळके ,प्राध्यापक एस.बी.सातपुते तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रणिता मुळे व सरपंच अनिल चव्हाण व यांचे मार्गदर्शन लाभले महाविद्यालयाचे विद्यार्थी अभिजीत वाघ, यश वाघ, ऋषिकेश वाघ, कृष्णा वाघ,अजय चव्हाण,नवनाथ गाडेकर,अजिंक्य भुसारी, आकाश फसले,अमित आर्दड,अमन मगर,तेजस जाधव,गणेश जाधव यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या गावातील शेतकऱ्यांनी देखील सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडावा असे आव्हान करण्यात आले.
Leave a Reply