अलियाबाद” गावातील जनावरांना छ.शा.म.शि. संस्था कृषी महाविद्यालय कांचनवाडी. येथील विद्यार्थ्यांनतर्फे लम्पी आजारावरती लशीकरण शिबिर

”अलियाबाद” गावातील जनावरांना छ.शा.म.शि. संस्था कृषी महाविद्यालय कांचनवाडी. येथील विद्यार्थ्यांनतर्फे लम्पी आजारावरती लशीकरण शिबिर.

Chha.Sambhajinagar:-  जिल्ह्यामध्ये सध्या लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव आणि फैलाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण हे जास्त प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे तसेच गावामधून जास्तीत जास्त जनजागृती करण्याची गरज जाणवत आहे त्या अनुषंगाने छ.शा.म.शि. संस्था संचलित कृषि महाविद्यालय, कांचनवाडी येथील सातव्या सत्रात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक कार्यक्रमा अंतर्गत अलियाबाद. ता. पैठण, जि. औरंगाबाद येथे दिनांक २३/०८/२०२३ रोजी पशु लसीकरण मोहीम राबिविण्यात आली. 

या प्रसंगी पशुवैद्यकीय डॉ. शेजुळ यांनी (१००) जनावरांना लसीकरण केले. या कार्यक्रमासाठी गावातील कृषि मित्र व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनावरांना पावसाळ्यात होणारे आजार व घ्यावयाची काळजी तसेच लम्पी स्कीन आजाराविषयी माहिती दिली व त्यावरील उपचार व जनावरांची घ्यावयाची काळजी यामध्ये गोठ्यातील स्वच्छता, स्वच्छ पाण्याचे नियोजन व जनावरांमध्ये लसीकरणाचे महत्व तसेच आजारी जनावर यांना इतरापासून वेगळे ठेवणे व प्रभावी वैद्यकीय उपचार करण्या विषयी माहित दिली तसेच गोठा आणि परिसरात कीटकनाशकांची फवारणी करणे किंवा अशक्तपणा, ताप आला असल्यास तातडीने उपचार करण्याविषयी मार्गदर्शन केले. 

या वेळी महाविद्यालयाचेविद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी के शेळके, प्राचार्य डॉ. पी. एस. बैनाडे, उपप्राचार्य प्रा.ए. ए.भोंडवे, प्रा. के. जी. सोळंकी, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.पी. डोंगरजाल व कार्यक्रम अधिकारी प्रा. नंदू भगस यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*