औरंगाबाद(दि. 2): वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी सलग्नित कृषी महाविद्यालय कांचनवाडी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय विशेष शिबिर कार्यक्रम- २०२२- २३ दिनांक १/०२/२०२३ ते ७/०२/२०२३ दरम्यान लाखेगाव तालुका -पैठण जिल्हा- औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे, त्या अनुषंगाने विशेष शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय संदीप शिरसाट, तालुका कृषी अधिकारी, तालुका पैठण, यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास लाखेगावच्या सरपंच सौ शिवकन्या लक्ष्मण रहाटवाडे, या अध्यक्षस्थानी होत्या, तसेच उपसरपंच माननीय ज्ञानेश्वर कागदे, माननीय श्री भगवान कागदे, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक सौ. मीनाक्षी मोरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. संदीप शिरसाठ यांनी आपल्या येथील उपलब्ध असलेल्या बाबीचा जास्तीत जास्त आपल्या शेतीमध्ये उपयोग करावा व त्यांनी इस्राईल येथील शेतीचे उदाहरण देऊन शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या आहारातील तृणधान्याचे महत्त्व व फायदे या विषयी कृषी सहाय्यक मीनाक्षी मोरे मॅडम यांनी माहिती दिली. या सात दिवशीय विशेष शिबिरामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्राम स्वच्छता, आरोग्य शिबिर, नव मतदान नोंदणी कार्यक्रम, पथनाट्य, विविध कृषी विषयावर चर्चा सत्र, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम, श्रमदान, जनजागृती रॅली इत्यादी. या शिबिरात संस्थेचे अधिकारी माननीय डॉक्टर श्रीकांत देशमुख यांचे मोलाचे योगदान लाभले.
तसेच कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संचालक डॉक्टर दत्तात्रय शेळके यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या शिबिरायोजनांमध्ये प्राध्यापक प्रणिता मुळे यांचे सहाय्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वाघमोडे योगेश यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थिनी राणी चव्हाण व रूपाली कायंदे व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी प्राजक्ता सवासे यांनी केले
✨👍