कृषि महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न,
विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांनी जिकंली प्रेक्षकाची मने
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दि. ५ जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाला.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या कलागुणांच्या बळावर मनाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक नवे वळण मिळावे या उदात्त हेतुने महाविद्यालयामध्ये अॅग्रीफेस्ट २०२२-२३ चे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये विद्यार्थ्यांसाठी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश होता. प्रथम दिवसाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक ङॉ.अंगदराव सूर्यवंशी प्राचार्य यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन ङॉ. ए.आर पाटील, विभाग प्रमुख भौतिकशास्त्र, शिवाजी महाविद्यालय उदगीर यांनी केले. न.कृ.ए.ग्रा.सं, सुगाव चे सचिव श्री. गंगाधरराव दापकेकर यांनी अध्यक्ष स्थान भुषवीले. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून ङॉ. अरविंद नवले , इंग्रजी विभाग प्रमुख, शिवाजी महाविद्याल, उदगीर आणि ङॉ. एम. बी. स्वामी, भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक विभाग प्रमुख, महाराष्ट्र उदयगीरी महाविद्याल हे होते. उपस्थित मान्यवरांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. प्रथमता सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात श्री गणेश च्या आरती ने झाली. विद्यार्थ्यांनी, शेतकरी आत्महात्या वास्तव वादी परिस्थितीवर नाटकाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.तसेच सर्व धर्म समभाव व देश भक्ती मुक-अभीनय, वाद्य वादन आणी लावणी नृत्य ईत्यादीचे सादरीकरण केले.
दुसर्या दिवसाच्या समारोपाच्या सांस्कृतिक व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन ङाॅ सचिन मोरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी, व.ना.म.कृ. वि.,परभणी यांनी केले. प्रमुख पाहूणे म्हणून ङॉ.अंगदराव सूर्यवंशी प्राचार्य, कृषि महाविद्यालय ङोंगरशेळकी तांङा, उदगीर, उपप्राचार्य ङॉ. लक्ष्मण पिंपळपल्ले व ङॉ.आशोकराव पाटील हे होते. या प्रसंगी ङॉ. सचिन मोरे यांनी विद्यार्थ्यांना खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबरच संशोधनात्मक राज्य स्तरीय विविध स्पर्धेत सहभाग घ्यावा असे अव्हान केले. तसेच विविध लोकला,कोळी नृत्य, सुगंम संगीत इत्यादीं चे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
संपन्न झालेल्या क्रिकेट,खो-खो,कबड्डी, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयामार्फत बक्षीस म्हणून संन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र उपस्थित मान्यावरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या वार्षिक स्नेहसंमेलन अॅग्रीफेस्ट २०२२-२३ आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य, ङॉ.अंगदराव सूर्यवंशी, उपप्राचार्य ङॉ. लक्ष्मण पिंपळपल्ले, जिमखाना उपअध्याक्ष ङॉ.वसीम शेख, ङी.ङी.ओ. ङॉ. आनंद दापकेकर याच्या अंतर्गत विविध सिमीत्या गठीत करण्यात आल्या होत्या. या मध्ये ङॉ. एस.बी.पवार, प्रा.एस. आर. खंङागळे, प्रा. एस. पी. पाटील, ङॉ. एस.एन. वानोळे, प्रा. एस. पी. जाधव, प्रा. ए. एस.काळे, प्रा. एस.ङी.लंजे, ङॉ.व्ही. एम. शिंदे, ङॉ.एस. बी. माने, प्रा.ए.बी मळभागे, ङाॅ.एस. एल. खटके, ङॉ. ङी. एम कोकाटे, सै. बबीता वारद, ङाॅ. ङी. जी. पानपट्टे, प्रा. एन.बी.राठोङ, प्रा. पी एन. सराफे,प्रा. एस.टी. ङफङे, प्रा. आर. ए. जाधव, प्रा. व्ही एल. सोमवंशी, प्रा. प्रवीण राठोड समस्त प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारीवर्ग यांनी बहुमोल योगदान दिले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पवन पाटील, विशाल पाटील, ओमकार पटणे, प्रतिक्षा नेवळे,निकीता पाटील या विद्यार्थ्यांनी केले व आभार ङॉ. सुनिल पवार आणि ङॉ. वसीम शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Leave a Reply