कृषीविषयक उपयुक्त मोबाईल प्रशिक्षण

कडेगाव :  लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगाव येथील कृषी विद्यार्थ्यांनी साटपेवाडीत शेतकऱ्यांना कृषीविषयक उपयुक्त मोबाईल प्रशिक्षण दिले. हे विद्यार्थी कृषी पदवी मधील सातव्या सत्रातील ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत साटपेवाडी गावात आले होते.
कृषी विभाग अंतर्गत कृषी उत्पन्न लागवड इत्यादी बद्दल मोबाईल ॲप द्वारे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये विद्यार्थ्यांनी कृषिविषयक उपयुक्त असे  एकात्मिक तण नियंत्रण,फळबागा विषयी जसे  तसेच माझी बाजार समिती, ॲग्रोवन, मौसम, अग्रो स्टार,बाजारभाव, फुले कृषी दर्शनी, ॲग्रोवन  या मोबाईल ॲप ची माहिती दिली. शेती करताना, उत्पन्न वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा अत्यंत सुलभरीत्या वापर करता येऊ शकतो हे या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले व त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी हे ॲप डाऊनलोड कसे करावे तसेच कसे वापरावे, त्याच्या पद्धती हे सर्व शेतकऱ्यांना दाखवून दिले.
यासाठी त्यांना प्राचार्य डॉ. डि. एम. सावंत सर,डॉ सी. डी औताडे, प्रा. ए. एच.पाटील सर,कार्यकमाधिकारी कृषी सहाय्यक मंदाकिनी थोरात मॅडमचे  मार्गदर्शन लाभले.यावेळी ग्रामस्थ सरपंच सुरेखा साटपे  व ग्रामस्थ शशिकांत  साटपे , शरद साटपे,जयवंत पाटील, बाळासो साटपे ,सच्छिदानंद साटपे, शिक्षिका अंजली महापुरे  यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यांचे मार्गदर्शन कृषी दूत अतिश नलवडे, शंभूराज मोहिते, सौरभ पवार, गौरव पाटील,  सुमित सबनीस, आफताब नदाफ, पद्मसिंह महाडिक यांनी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*