मल्लापुर:- उदगीर तालुक्यातील मल्लापूर या गावी पशुवैद्यकीय दवाखाना व कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर अंतर्गत घटसर्प आणि फर्या या रोगाबदल जनावरांना लसीकरण करण्यात आले.
हा ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम ङाॅ. ङी.एन. गोखले, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि), व.न.म.कृ., परभणी, ङाॅ. आर.पी. कदम, विस्तार शिक्षण विभाग, व.न.म.कृ., परभणी आणी कृषि महाविद्यालय लातूरचे कार्यक्रम समन्वयक ङाॅ. व्ही. बी.कांबळे यांच्या नामनिर्देशनाखाली सबंध मराठवाड्यामध्ये विविध कृषि महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
या माध्यमातून उदगीर तालुक्यातील मल्लापुर गावात लसीकरण उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी अनंत सुर्यवंशी , डॉ. सूरज काकरे, विद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. सुर्यवंशी कार्यक्रम समन्वयक ङाॅ. एस. एन. वानोळे आणी कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.बी. माने तथा विषय तज्ञ प्रा. शितल पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी कृषिदुत ” *ऋषीकेश मोरे , प्रथमेश पडघान , युवराज नागटिळक , शिवप्रसाद मिर्झापुरे, विवेकानंद पांडुगा,अन्वेष नेनवठ, बस्वराज मुळावकर,* आणि गावातील महिला व प्रतिष्ठित नागरिक या वेळी उपस्थित होते.
Leave a Reply