डोणगावात पार पडले जनावरांचे भव्य लसीकरण

 पैठण (औरंगाबाद): पैठण तालुक्यातील डोणगाव येथे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय या अंतर्गत भव्य पशुलसिकरणाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळा सुरू झालेला असून पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण महत्वाचे आहे. शेतकऱ्यांमध्ये याची जनजागृती व्हावी, यादृष्टीने या शिबीराचे आयोजन केले होते.

महाविद्यालयाचे विद्यार्थी मिथुन राठोड ,अर्जून राजपुत, अजय राठोड, विकास साबळे, सौरभ सदाफळ, अनिकेत साखळे, वैभव सपकाळ, किरन सरवदे, रोहित सरदार, आशुतोष सावंत, आशुतोष बोडखे, आकाश व्यवहारे यांनी या लसिकरणाचे आयोजन केले होते.

लसिकरणासाठी लाळ्या खुरकुत व फऱ्या या रोगांची लस जनावरांना देण्यात आली. एकूण 200 जनावरांना लसी देण्यात आल्या.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. शेळके यांचे मार्गदर्शन लाभले तर डॉ. सचिन गायकवाड, प्राध्यापक कैलास सोळंकी आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रणिता मुळे यांचे योगदान कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाभले. त्याचबरोबर पशुधन पर्यवेक्षक डॉ. मनोज पाडवी आणि डॉ. राहुल चाबुकस्वार यांनी लसीकरण करण्यासाठी मदत केली आणि सर्व ग्रामस्थ कार्यक्रमासाठी उपस्थित होते.


Contact (for news):

G-mail:  bscagristudy@gmail.com


 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*