कापुसवाडी ता.18(पैठण) : बालानगर जवळील कापुसवाडी येथे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय व पशुवैद्यकीय दवाखाना बालानगर यांच्या अंतर्गत भव्य पशुवैद्यकीय लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
पावसाळा सुरू झाला असून पावसाळापूर्व जनावरांचे लसीकरण करणे गरजेचे असते.यावेळी लाळ्या,खुरकुत व फय्रा रोगांची लस जनावरांना देण्यात आली.यावेळी एकुण 150 जनावरांचे लसीकरण करण्यात आले.
शेतकऱ्यांत जनारांच्या आजाराविषयी जनजागृती व्हावी म्हणून या महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राजक्ता सवासे,अर्पिता स्वामी,मयुरी घाटेराव,नेहा शिंगारे,स्वर्णलता पुट्टा,आशा मेडीपल्ली,दिपक जाधव,प्रज्वल सोनसळे, निखील इंगोले,तन्मय इंगोले,जे माधव,इंगु विद्यासागर, नागा पवनसाई,या विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती केली.
लसीकरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डि.के.शेळके,डॉक्टर सचिन गायकवाड, प्राध्यापक कैलास सोळंकी, कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक प्रणिता मुळे यांचे मार्गदर्शन लाभले तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाडवी,राहुल चाबुकस्वार यांनी मदत केली.यावेळी सरपंच बाबासाहेब ढोले,उपसरपंच तुकाराम इंगळे,सोपान इंगळे,यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते.
Contact (for news):
G-mail: bscagristudy@gmail.com
Leave a Reply