औरंगाबाद (पैठण):
छत्रपती शाहू महाराज संस्था संचालित कृषी महाविद्यालय कांचनवाडी येथील कृषी विद्यार्थ्यांनी कापुसवाडीत शेतकऱ्यांना कृषीविषयक उपयुक्त मोबाईल प्रशिक्षण दिले. हे विद्यार्थी कृषी पदवी मधील सातव्या सत्रातील ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत कापुसवाडी गावात आले होते.
कृषी विभाग अंतर्गत कृषी उत्पन्न लागवड इत्यादी बद्दल मोबाईल ॲप द्वारे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये विद्यार्थ्यांनी कृषिविषयक उपयुक्त असे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले कापूस , एकात्मिक तण नियंत्रण,फळबागा विषयी जसे डाळिंब ,सिताफळ , मोसंबी तसेच माझी बाजार समिती, ॲग्रोवन, मौसम या मोबाईल ॲप ची माहिती दिली. शेती करताना, उत्पन्न वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा अत्यंत सुलभरीत्या वापर करता येऊ शकतो हे या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले व त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी हे ॲप डाऊनलोड कसे करावे तसेच कसे वापरावे, त्याच्या पद्धती हे सर्व शेतकऱ्यांना दाखवून दिले.
यासाठी त्यांना प्राचार्य डॉ. डि.के. शेळके सर व कार्यकमाधिकारी प्रा. प्रणिता मुळे व कृषिविद्या विभागाचे विषयतज्ञ प्रा. एस.बी.सातपुते सरांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी ग्रामस्थ सरपंच बाबासाहेब ढोले, उपसरपंच तुकाराम इंगळे व ग्रामस्थ शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Contact (for news):
G-mail: bscagristudy@gmail.com
Telrgram: Eagrinews (group)
Leave a Reply