वंसंतराव नाईक मराठवाङा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय ङोंगरशेळकी तांङा उदगीर आणि द युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये कृषि पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षा (UPSC/MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षा) मार्गदर्शन आँनलाईन वेबिनार दि. 17 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.
या आँनलाईन वेबिनार चे प्रस्तावना ङाॅ. एस. एन. वानोळे यांनी केली. आँनलाईन वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाबरोबरच स्पर्धात्मक परीक्षा युपिएसी (संघ लोकसेवा आयोग) ,एमपिएसी ( महाराष्ट्र लोकसेवा आयोग) या संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा या संदर्भात विद्यार्थ्यांना
माहीती होण्यासाठी सखोल मार्गदर्शन द युनिक अकॅडमी , पुणे चे श्री रवींद्र ताजने यांनी केले . विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी कशी करावी , तसेच वेळेचे नियोजन, परीक्षांचे नियोजन अभ्यासक्रम, पूर्वतयारी परीक्षा यासंदर्भात विस्तृत माहीती सांगीतली.
याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ. ए.पी सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांनी कृषि पदवी अभ्यासक्रम आणि स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करावा व कार्य कुशल , कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी व्हावेत आणि विद्यार्थ्यांनी पदवीपासून करीअर कडे गांभीर्याने पाहिले पाहीजे असे मार्गदर्शानवेळी सांगीतले.
कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे उपप्राचार्य ङाॅ. एल. व्ही. पिपंळपल्ले, सहयोगी प्राध्यापक ङाॅ. ए.एम पाटील, श्री. चंद्रकात खरात, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. ए. बी. मळभागे यांनी उपस्थिताचे आभार मानले.
Leave a Reply