पोरगाव येथे छ.शा. म.शि.संस्था कृषि महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर

पोरगाव येथे छ.शा. म.शि.संस्था कृषि महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर

            छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित कृषी महाविद्यालय, कांचनवाडीच्या वतीने पैठण तालुक्यातील पोरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या विशेष शिबिराचे उद्घाटन दिनांक 5 रोजी झाले. प्रमुख उद्घाटक म्हणून पोरगाव चे सरपंच मा. श्री. प्रभाकर निळ हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.श्री. अतुल भोंडवे होते तसेच उपसरपंच मा. श्री. बिहारीलाल राठोड, ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. ज्ञानेश्वर भालेकर, प्राध्यापक मा. श्री. वैभव रायभोग व इतर ग्रामस्थ व स्वयंसेवक उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर 23-24 चे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश वाघमोडे यांनी केले व शिबिरात राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली. उद्घाटन प्रसंगी भाषणात बोलताना प्राध्यापक श्री. वैभव रायभोग यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा युवकांमध्ये एक चैतन्य निर्माण करण्याचे काम करते व त्याचा फायदा सामाजिक जीवनामध्ये व समाजासाठी होतो असे त्यांनी सांगितले. तसेच कृषि महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अतुल भोंडवे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात युवकांचे समाज विकासातील योगदान याबद्दल माहिती दिली.

          या विशेष शिबिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये आरोग्य शिबिर, ग्राम स्च्छता पथनाट्य, कृषि विषयक व्याख्याने, नवं मतदार जनजागृती फेरी व नव मतदार नोंदणी कार्यक्रम, शिवार फेरी, काव्य वाचन, भारुड व समाज प्रबोधन करण्यासाठी वक्ते यांचे व्याख्यान इत्यादी.

          कार्यक्रमात कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ३५ विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक डॉ. योगेश वाघमोडे कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. साईनाथ झाल्टे व डॉ. मोहिनी देशमुख यांनी सहभाग घेतला होता. तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख व कृषि महाविद्यालयाचे संचालक डॉ. दत्तात्रय शेळके यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण बैनाडे व उपप्राचार्य प्रा. अतुल भोंडवे यांचे सहकार्य लाभले.

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*