कृषि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले श्रमदान
सह्याद्री प्रतिष्ठान व छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषि महाविद्यालय, कांचनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४/०९/२०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त व ‘स्वच्छता ही सेवा’ या विशेष अभियाना अंतर्गत किल्ले भांगशी माता गड येथे पाण्याच्या टाक्यामधील गाळ साफ करणे,प्लास्टिक कचरा व स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. सदरील मोहिमेत कृषि महाविद्यालायाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या २२ विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक डॉ. वाघमोडे योगेश, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना प्रा. भगस नंदकुमार व प्राध्यापिका राठोड दीपिका सहाय्यक प्राध्यापक तसेच सह्याद्री प्रतिष्ठान चे ७ दुर्गसेवक यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. सदरील मोहिमेला सकाळी १० वाजता मार्गदर्शक सूचना देऊन सुरवात करण्यात आली. त्या मध्ये गडावरील ज्या पाण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत त्यामधील वाढलेले गवत, गाळ काढण्यात आला व टाक्यांच्या समोरील वाढलेली झाढे झुडपे काढण्यात आली तसेच गडावरील प्लास्टिक कचरा, रिकाम्या बॉटल व इतर काडी कचरा गोळा केला व गोळा केलेला कचरा गडावरून खाली आणण्यात आला व त्याची विल्हेवाट लावण्यात आली. सदरील मोहिमेत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्सहाने सहभाग घेऊन कामे केली व पुन्हा एकदा असे कार्यक्रम घेण्याची विनंती केली. सदरील मोहिमेसाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री डॉ. श्रीकांत देशमुख व कृषि महाविद्यालायचे संचालक तथा प्राचार्य डॉ. दत्तात्रय शेळके यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply