यवतमाळ : – डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मारुती कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थिनी कु. सुप्रिया बल्लाळ ने खरोळा खुर्द तालुका यवतमाळ येथे पेरणीपूर्व बीज प्रक्रियेचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनीने बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले बुरशीनाशक म्हणून ट्रायकोडर्मा तसेच जिवाणू संवर्धक म्हणून रायझोबियम आणि वनस्पती वाढीसाठी जिबर्लीन अम्ल घटकांना वापर करण्यात आला. बीजे प्रक्रियेने पिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे सांगितले.
या प्रशिक्षण करिता कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. ओ. ठाकरे, उप प्राचार्य एम . वी . कडू विशेषज्ञ डॉ. पी. एन. बोबडे, प्रा.के .टी. ठाकरे, प्रा. ए. ए. डोंगरवार आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. वि. महानूर यांची मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply