संभाजीनगर: पैठण तालुक्यातील कापूसवाडी येथे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय व ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक संलग्नता २०२२-२०२३ या अंतर्गत आयोजित व हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै (शुक्रवारी) महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला. या कृषी दिनी गावात कृषी मेळावा भरवण्यात आला तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला.
महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राजक्ता सवासे,अर्पिता स्वामी,मयुरी घाटेराव,नेहा शिंगारे,स्वर्णलता पूट्टा,आशा मेडीपल्ली ,दिपक जाधव,प्रज्वल सोनसळे,निखिल इंगोले,तन्मय इंगोले,जे माधव,इंगु विद्यासागर,नागा पवनसाई यांनी या कृषी मेळावा तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकूण १०० झाडांचे गावात वृक्षारोपण तसेच वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. राम जोंधळे यांनी उत्पादन खर्च कमी करा व नफा वाढवा या विषयावर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना ‘गोडवा शेतीचा’ हे मासिक वाटप केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. शेळके यांचे मार्गदर्शन लाभले तर डॉ. राम जोंधळे, डॉ.विजय धुलगंड आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रणिता मुळे यांचे योगदान कार्यक्रम यशस्वीततेसाठी लाभले. त्याचबरोबर कापुसवाडी गावाचे सरपंच बाबासाहेब ढोले, उपसरपंच तुकाराम इंगळे , शालेय समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य योगेश तांबे , सोपान इंगळे ,कृषी सहाय्यक रामेश्वर दहिदार व डी.जी.भवर यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास लाभली. कृषी दिनाचे औचित्य साधून गावातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.
Leave a Reply