औरंगाबाद: भांडेगांव ग्रामपंचायत व छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित कृषी महाविद्यालय येथील विद्यार्थी अभिषेक घोबाऴे,यश हावरे,विवेक गायकवाड,मनोज कठाळे,सचिन घोडके,श्रेया पंजाबी, शरायु कांबळे,प्राजक्ता कराळे, अंकिता भारती यांनी कृषिदिना निम्मित ग्रामीण कार्यानुभव घेतला.या कार्यक्रमात भांडेगांव ग्रामपंचयत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थांना उत्स्फर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरवात वृक्षवाटप व वृक्षदिंडी ने झाली. त्यानंतर मुख्याध्यापक होळकर सर यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांचा प्रतीमे ला अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी यश हावरे व श्रेया पंजाबी यांनी वसंतराव नाईक व कृषीदिन या विषयावर माहिती दिली.या वेळी ग्रामपंचायत सदस्य जग्गणाथ चव्हाण, विष्णू चव्हाण. मा.सरपंच अविनाश वेताळ, शाळा कार्याध्यक्ष निवृत्ती वेताळ,पो.पा. संतोष वेताळ,सुशील वेताळ,सुनील वेताळ, जनार्दन चव्हाण, विष्णू वेताळ व समस्त गावकरी मंडळी यादिंची उपस्थीती होती.
Leave a Reply