गणोरी : औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील जिल्हा परिषद शाळा येथे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय व ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक संलग्नता २०२२-२०२३ या अंतर्गत कृषी दिन आयोजित करण्यात आला होता. या कृषी दिनी गावात भव्य कृषी मेळावा भरण्यात आला तसेच वृक्षारोपण चा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
महाविद्यालयाचे विद्यार्थी पूजा ढंगारे,आकांक्षा शेवाळे, आकांक्षा बोराडे, सविता कळम, गीतांजली गव्हाड, सुमेध पातोडे, विरेन प्रसाद,आकाश शिंदे,मोहन शेटे, आविष्कार पुसावळे,रुपेश रावते,विकास पवार यांनी या कृषी मेळावा तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
एकूण १०० झाडांचे गावात वृक्षारोपण तसेच वितरण करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये गणोरी गावाचे सरपंच सौ.सरलाताई तांदळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. देशमुख सर व प्राचार्य श्री. ठाकूर सर व तसेच कृषीमहाविद्यालयाचे कृषी विद्या विषय तज्ञ डॉ.सातपुते सर यांनी कृषी दिनानिमित्त मार्गदर्शन दिले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. शेळके यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रा. श्री डॉ. सातपुते व कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रणिता मुळे यांचे योगदान कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाभले. त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ कार्यक्रमासाठी उपस्थित राहून त्यांनी सर्व कार्यात हातभार लावला .
Leave a Reply