मांडकी : औरंगाबाद जिल्यातील मांडकी येथे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय व ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक संलग्नता २०२२-२०२३ या अंतर्गत कृषी दिन आयोजित करण्यात आले होते. या कृषी दिनी गावात भव्य कृषी मेळावा भरण्यात आला तसेच वृक्षारोपण चा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
या गावात असलेल्या कृषिदूतांनी शेतकर्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्यासाठी ट्रॉयकोकार्ड काय असते याचे महत्व समजावुन सांगितले तसेच त्या ट्रॉयकोकार्ड मधून तयार होण्याऱ्या मित्र किटंक कश्या प्रकारे विविध पिकांमध्ये घातक कीटकांचा नाश करते याची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली.
महाविद्यालयाचे विद्यार्थी अविनाश काळे,शैलेश बोरकर,विजय जगताप, रोहित जाधव, पवन काळे,कमलेश जाधव,ज्योती ठोंबरे,संस्कृती पडुळ,ऋतुजा वाळके,साक्षी वाघ, वैष्णवी शेळके, हर्षदा विश्वासू यांनी या कृषी मेळावा तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकूण १०० झाडांचे गावात वृक्षारोपण तसेच वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. शेळके यांचे मार्गदर्शन लाभले तर प्राध्यापक श्री.डोंगरजाळ आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रणिता मुळे यांचे योगदान कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाभले. त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ कार्यक्रमासाठी उपस्थित राहून त्यांनी सर्व कार्यात हातभार लावला .
Contact (for news):
G-mail: bscagristudy@gmail.com
Leave a Reply